मतदान मिळवण्यासाठी सतीश सावंतांची जिल्हा बॅकेच्या अधिकाऱ्यांना “दमदाटी”…

3
2
Google search engine
Google search engine

राजन तेलींचा आरोप; आचारसंहिता भंगाची तक्रार, प्रसंगी आंदोलनही करण्याची तयारी….

कुडाळ,ता.१०:आपल्या पॅनलला मतदानात यश मिळण्यासाठी जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत हे अधिकाऱ्यांना मतदान मिळण्यासाठी दमदाटी करीत आहेत.तसेच काही सभासदांना पैशाचे आमिष दाखवत आहेत.आमच्यातील काही लोक निवडून देऊ नये यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांवर दबाव आणत आहेत, असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.दरम्यान त्यांच्या या प्रकाराबद्दल आम्ही प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भाजपाचे जिल्हा संयोजक अतुल काळसेकर रवी मडगावकर, गुरुनाथ पेडणेकर, मनीष दळवी आदी उपस्थित होते.
याविषयी तेली म्हणाले या ठिकाणी आपल्याला यश मिळावे यासाठी विद्यमान अध्यक्ष चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. त्या ठिकाणी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दमदाटी करून आपल्याला मतं मिळाले पाहिजे. यासाठी प्रयत्न करा असे सांगत सांगितले जात आहेत. हा सर्व प्रकार अत्यंत चुकीचा आहे. याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.असे ते म्हणाले. याठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या काळात चुकीच्या पद्धतीने कामकाज झाले.बँकेची परिस्थिती नसताना इतर खर्च दाखवत अनेक कर्मचारी भरण्यात आले. सभासदांना लालच दाखवण्यासाठी हा सर्व प्रकार झाला आहे. असा आरोप तेली यांनी केला. त्याचबरोबर जेवणावेळी शर्ट पॅन्ट पीस वाटप करण्यात आले. त्याच्या सर्व पुरावे आमच्याकडे आहेत असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे आमच्यावर पैसे कुठून आणले असा सवाल
करणारे सत्ताधारी रात्री उशिरापर्यंत काही उमेदवारांनी आणलेले पैसे कसे भरून घेतात या प्रकरणात बॅकेचे अधिकारी व कर्मचारी अडचणीत येणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे.