मसुरेत अनधिकृत वाळू वाहतुकीचा डंपर पकडला…

3
2
Google search engine
Google search engine

महसूलच्या पथकाची कारवाई ; डंपर जप्त…

मालवण, ता. ११ : मसुरे स्टेट बँक समोरील रस्त्यावर अनधिकृत वाळूने भरलेला डंपर क्रमांक एम. एच. ०७ सी-६२६६ मसुरे मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण यांनी पकडला. हा डंपर ताब्यात घेण्यात आला आहे.

आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या दरम्याने डंपर मालक किर्तिराज मुणगेकर यांच्या ताब्यातील या अनधिकृत वाळू डंपरवर मसुरे मंडळ अधिकारी यांनी धडक कारवाई केली. यावेळी मसुरे कोतवाल सचिन चव्हाण, मसुरे पोलीस श्री. फरांदे हे उपस्थित होते. काही दिवसापूर्वी मसुरे परिसरातील अनधिकृत वाळू रॅम्पही मंडळ अधिकारी श्री. चव्हाण यांनी महसूल यंत्रणा आणि पोलिसांच्या साह्याने तोडले होते. यापुढेही या भागातून अनधिकृत वाळू वाहतूकीवर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.