सिंधुदुर्ग कबड्डी संघासाठी मालवण येथे निवड चाचणी संपन्न…

3
2
Google search engine
Google search engine

जिल्हा कबड्डी फेडरेशनचे आयोजन; मुला-मुलींच्या दोन गटांचा समावेश…

मालवण ता.१३: येथील भंडारी हायस्कूलमध्ये सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने किशोर-किशोरी जिल्हा संघ निवड चाचणी घेण्यात झाली. यावेळी दोन्ही गटातून एकूण ७० मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.खोत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग कबडी फेडरेशनचे कार्यवाह श्री दिनेश चव्हाण, प्रशिक्षक श्री नितीन हडकर, रेनॉल्ड बुतेलो, क्रीडाशिक्षक अजय शिंदे ,जयसिंग पाटील, प्रशिक्षक साळुंखे सर ,जीडी सावंत, पंच प्रीतम वालावलकर, राजेश सिंगनाथ ,राष्ट्रीय खेळाडू आलिस्का आल्मेडा,शुभम धुरी, भूषण पाटकर आदी मानवर उपस्थित होते.

किशोर गट मुलगे निवड झालेले खेळाडू- १) यश संतोष गाटे २)जानू विठ्ठल खरात३) पार्थ सतीश मांजरेकर४) सर्वेश सतीश चव्हाण५) बाळू गोपाळ तांबे६) मयुरेश नामदेव पाटकर७) पांडुरंग देऊ हुंबे ८)संदीप घाटू शिंदे ९)यश विलास मालवणकर१०) साहिल विश्वास तावडे ११)अर्जुन धोंडीराम कोकरे १२)सुमित संतोष चिंदरकर १३)यज्ञेश जयवंत कावले१४) रुद्राक्ष केशव कांदळकर१५) प्रसाद बन्सीधर चव्हाण, तर कुमारी गट मुली खेळाडू १)सुहानी सुहास गावडे२) मानसी लक्ष्मण राऊळ ३)आदिती दिनेश चव्हाण ४)हिमानी नागेश धुरी५) निर्जरा विलास कांबळे६) समीक्षा संजय हळवे७) ऋतुजा वसुंधर आंगणे ८) श्रावणी गुरुदास राऊळ ९) पूजा अनिल मेतर १०)शीतल सत्यवान देसाई ११) श्रेया झिलू मोर्ये १२) आर्या खेमराज परब १३)महिमा निलेश तारी १४)दिव्या कृष्णा राणे १५)भक्ती सुरेश रजपुत. या 30 खेळाडूंचे सराव शिबिर घेऊन अंतिम २४ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. मुलींचे सराव शिबिर आज दिनांक १३ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ३ ते ६ या वेळेत आर. पी. डी.हायस्कूल सावंतवाडी येथे राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक आलिस्का आल्मेडा हिच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे .तर किशोर गट मुलगे यांचे सराव शिबिर कुडाळ हायस्कूल कुडाळ च्या मैदानावर फिटनेस ट्रेनर व प्रशिक्षक श्री भूषण भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 13 ते 17 डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ३ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. तरी कृपया निवड झालेल्या खेळाडूंनी ठरवून दिलेल्या प्रशिक्षण स्थळी नियोजित वेळेत हजर रहावे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या खेळाडू नोंदणी करिता येताना खेळाडूंनी सोबत आपले मूळ आधार कार्ड आणावे