सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

2
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.१८: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७३७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.