वेंगुर्ले येथे २६ डिसेंबरला जिल्हास्तरीय द्वितीय कवी संमेलन…

3
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२२:आम्ही बालकवी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक २६ रोजी वेंगुर्ले येथे खुले जिल्हास्तरीय द्वितीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

सौ. देवयानी आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणारे हे कवी संमेलन स्वामी विवेकानंद सभागृह, नगरपरिषद प्रशासकीय इमारत दुसरा मजला, वेंगुर्ले येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन सौ. प्राजक्ता आपटे यांनी केले आहे. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या या संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवी, साहित्य रसिक यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आम्ही बालकवी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राजेंद्र गोसावी (मो. 9405778726) यांच्याशी संपर्क साधावा.