प्रविण भोसले यांच्या पत्नी अनुराधा कोरोना पॉझिटिव्ह…

4
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१२: माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या पत्नी सौ. अनुराधा भोसले या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. त्यांच्यावर गोवा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान आपल्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन श्री. भोसले यांनी केले आहे. तसेच गोव्यातील रुग्णालयात मोठी गर्दी असल्याने जिल्हा प्रशासनाने सावंतवाडीत पुन्हा एकदा कोविड सेंटर सुरू करावे आणि रुग्णांची योग्य ती काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी दुरध्वनीवरुन संपर्क साधून ही माहीती दिली.