आरोग्य विभागाच्या “सिंधू पाऊले चालती पंढरीची वाट” उपक्रमाला उद्यापासून प्रारंभ…  

1
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२८: आरोग्य विभागाचा “सिंधू पाऊले चालती पंढरीची वाट” उपक्रमाला उद्यापासून सुरू होत आहे. माणगाव व कणकवली येथून या वारीला सुरूवात होणार आहे. दरम्यान जिल्हातील वारकऱ्यांनी सहभागी व्हावे, व आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य सभापती अनिशा दळवी यानी केली आहे .

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी व माघी वारी निमित्त दरवर्षी मोठया संख्येने सिंधुदुर्ग जिल्हयातून वारकरी संप्रदायाचे लोक जात असतात. सदर पायीवारी मध्ये 12 दिवसांचा मुक्काम असतो. अशा वारकरी मंडळींना प्रवासादरम्यान वैदयकीय मदतीची गरज निर्माण होते.

अशा वारीला जाणा-या वारक-यांसाठी आपण आपल्या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील आरोग्य विभागामार्फत सिंधु पाऊले चालती पंढरीची वाट ही योजना राबविली जात आहे. या योजनेतर्गत सदर वारकरी मंडळींसोबत दोन रुग्णवाहिका, वैदयकिय अधिकारी, औषध निर्माता व आरोग्य सहायक वैदयकिय साहित्यासह सोबत देणार आहे जेणेकरुन वारकरी मंडळींना तात्काळ वैदयकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. उद्या दिनांक 29 रोजी सकाळी कणकवली आणि माणगाव येथून निघेल. या वारी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आरोग्य सभापती अनिशा दळवी यानी केले आहे.