उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी निर्जरा परबांचे बांद्यात केले अभिनंदन…

3
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२८: रोणापाल गावच्या पोलीस पाटील निर्जरा परब यांना राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील सेवा रत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी बांदा येथे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. निर्भीड पणे व सचोटीने काम करणाऱ्या पोलीस पाटील निर्जरा परब यांचे कार्य अभिमानास्पद असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

रोणापाल गावच्या पोलीस पाटील निर्जरा परब यांना माहीती सेवा समिती पुणे (अखिल भारतीय) डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी, तसेच लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय आर्दश पोलिस पाटील सेवारत्न पुरस्कार २०२० हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल खुद्द पोलीस अधिक्षक श्री. दाभाडे, सावंतवाडी उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत पानवेलकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सावंतवाडी दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. बेडगकर, माजी पालकमंत्री दिपक केसरकर, माजी आमदार शिवराम दळवी, माजी जिल्हा परीषद सदस्य प्रमोद कामत, पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई, शेर्ले सरपंच उदय धुरी, निगुडे सरपंच समीर गावडे, माजी पंचायत समिती सदस्य बबन राणे यांच्यासह महिला व बालविकास बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सौ. परब यांची भेट घेऊन अभिनंदन केले आहे.

यावेळी बांदा बांदा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे तसेच पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.