डिंगणे येथे १७ फेब्रुवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

2
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.११: डिंगणे-बांबरवाडी येथे १७ फेब्रुवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, श्री स्थापेश्वर भजन मंडळ, डेगवे यांचे सुश्राव्य सुप्रसिद्ध भजनी बुवा तात्या स्वार यांचे भजन गायन, चंद्रकांत उर्फ भाई सावंत (डींगणे – पाशीवाडी) यांचा जाहीर सत्कार. तर खास आकर्षक रात्री ठीक ८ वाजाता चेंदवणकर दशावतारी नाट्यमंडळाचा खास अध्यात्मिक नाट्यप्रयोग “श्री स्वामी समर्थ ” होणार आहे. तरी सर्वं भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक ग्रामस्थ व व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले आहे.