शिरगाव येथे उद्या ‘तेरा त्रिक एकोणचाळीस’ पुस्तकाचे प्रकाशन…

2
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२२: कवयित्री व लेखिका डॉ. सई लळीत यांनी बालकुमारांसाठी लिहिलेल्या ‘तेरा त्रिक एकोणचाळीस’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार, ता. २३ रोजी सकाळी ११ वाजता शिरगाव हायस्कुल (ता. देवगड) येथे होत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

 

या कार्यक्रमाला लेखिका डॉ. सई लळीत, मुख्याध्यापक शमसुद्दीन अत्तार, नाट्यदिग्दर्शक डॉ. राजेंद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. बालकुमार, किशोरवयीन मुलांमुलींसाठी लिहिलेल्या या पुस्तकात ३९ गोष्टींचा समावेश आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक श्रीकांत बोजेवार यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. छान छान चित्रांसह उलगडत जाणाऱ्या, चुटके सांगितल्यासारख्या या छोट्या छोट्या रंगतदार कथा घरातील धमाल कौटुंबिक प्रसंगांची एखादी वेब सीरीज पाहावी तशा वाटतात आणि चटक लावतात. आपण पुढची, पुढची म्हणत एका दमात सगळ्याच वाचून टाकतो, असे श्री. बोजेवार यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अदिती लळीत हिचे असुन आतील रेखाचित्रे शुभेन्दु लळीत याने काढली आहेत. प्रकाशन कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी पुस्तकातील काही निवडक कथांचे वाचन करणार आहेत.