आंबोलीत २१ तारखेला दुर्ग महर्षीचे “मावळ्यांच्या मुलखात” या छायाचित्राचे प्रदर्शन…

2
2
Google search engine
Google search engine

राजे प्रतिष्ठानचे शिवजयंती निमित्त आयोजन; विद्यार्थ्यांसह आशासेविकांचा होणार सन्मान…

आंबोली,ता.२०: येथील राजे प्रतिष्ठान कामतवाडी यांच्या माध्यमातून २१ तारखेला शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पुणे येथील दुर्ग महर्षी प्रमोद मांडे यांचे “मावळ्यांच्या मुलखात” या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास गावडे यांनी दिली. हा कार्यक्रम येथील आंबोली-कामतवाडी येथे होणार आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून महादेवगड ते कामतवाडी अशी शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर शिवमुर्तीचे पुजन मानवंदना आणि शालेख विद्यार्थ्याचे कार्यक्रम व आशा सेविकांचा सत्कार आदी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी बारा वाजता छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष शिवाजी गावडे, सचिव प्रसाद गावडे, योगेश गावडे, गुणाजी गावडे, बाळू सावंत, सतिश गावडे आदी राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.