गोवा येथे हृदय शस्त्रक्रियेसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानकडून रक्तदान…

2
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२३: सात-आठ वर्षांपूर्वी अपंगत्व आलेल्या मुटाट-देवगड येथील विजय सीताराम घाडी वय ४६ यांना गोवा बांबोळी हॉस्पिटल येथे हृदय शस्त्रक्रियेसाठी रक्तदात्यांची गरज होती.यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे रक्तदाते साईस्वरूप देसाई व सुनिल गावडे यांनी गोवा येथे जात रक्तदान केले.

तसेच या केससाठी श्री. मित्तल देसाई (तांबोळी, सावंतवाडी) व एक स्थानिक रक्तदाते हे सुद्धा गोवा येथे रक्तदान करण्यास गेले होते, मात्र काही तांत्रिक कारणास्तव ते दोघे रक्तदान करू शकले नव्हते.चार रक्तदाते पाहिजे होते, पण दोघे रिजेक्ट झाले म्हणून पेशंटची धर्मपत्नी अस्वस्थ झाली, आणि नुकतेच रक्तदान केलेल्या साईस्वरुप देसाई यांना आपली व्यथा बोलून दाखविली. त्यावेळी साईस्वरुप देसाईने त्यांना धीर दिला आणि केवळ रक्तदान करुनही स्वस्थ न बसता त्याने रात्रभर धडपड करुन आपल्या एका मित्राला आणि भाच्याला पहिल्यांदाच रक्तदानासाठी प्रेरीत केले आणि रक्तदान करवून घेतले. मेल्किऑर परेरा, सावंतवाडी यांनी केवळ एकविसाव्या वर्षी पहिल्यांदाच तर अनिकेत खानोलकर, केर, ता. दोडामार्ग यांनी अठ्ठाविसाव्या वर्षी पहिल्यांदाच रक्तदान केले. पहिल्यांदाच रक्तदान करीत असल्यामुळे त्यांना फोटो काढायला सुचले नाही म्हणून त्यांचे वरील फोटो परीचयासाठी पाठविले आहेत.