“आनंद क्लिनिक” टेस्ट ट्यूब बेबी आणि न्यूरोलॉजी रुग्णांसाठी “वरदान” ठरेल….

4
2
Google search engine
Google search engine

 

विनायक राऊत; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण,आमदार केसरकरांची उपस्थिती…

सावंतवाडी ता.०२: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सुरू करण्यात आलेले “टेस्ट ट्यूब बेबी सेंटर” आणि “न्यूरोलॉजी सेंटर” रूग्णांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास आज या ठिकाणी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. दरम्यान आनंद क्लिनिकच्या माध्यमातून यापुर्वीही रूग्णांना मदत झाली आहे. आता होऊ घातलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचाही नक्कीच फायदा होईल, असे आमदार दीपक केसरकर म्हणाले. डॉ. जयेंद्र परळेकर यांच्या माध्यमातून आज सुरु करण्यात आलेल्या “आनंद क्लिनिक” चे पुर्नलोकार्पण आज श्री. राऊत आणि श्री. दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी क्लिनिकच्या प्रमुख डॉ. डॉ. लीना परुळेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, जिल्हा परिषद माजी सदस्य नागेंद्र परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, अण्णा केसरकर, अशोक दळवी, दादा परब, अमेय तेंडुलकर, अमोल साटेलकर, डॉ. मुकुंद अंबापुरकर, डॉ मृदुला अंबापुरकर, डॉ. अजय मुंढेकर, डॉ. मनीष कुशे आदींसह मोठ्या संख्येने परूळेकर कुटुंबीय व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्री.राऊत पुढे म्हणाले, टेस्ट ट्यूब बेबी ही उपचार पद्धती मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी होते. मात्र सिंधुदुर्गातील बऱ्याच वंध्यत्व असलेल्या स्त्रिया आपल्या आर्थिक दुर्बलतेपायी हा उपचार करू शकत नाहीत. अशांना आता आनंद क्लिनिकचा आधार मिळणार आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात सेवा दिली जाणार असल्यामुळे त्याचा फायदा सिंधुदुर्गातील महिलांना होणार आहे. तर या अत्याधुनिक तंत्राद्वारे त्यांच्या कुटुंबात आनंदाचा नवा किरण येणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी श्री.केसरकर म्हणाले, आनंद क्लिनिकचे प्रमुख डॉ.परुळेकर यांना त्यांच्या आजोबांचा वारसा लाभलेला आहे. ते याठिकाणी गरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित होते. तशीच सेवा देण्याचा मानस डॉ. परूळेकर यांचा आहे. त्याच माध्यमातून त्यांनी आनंद क्लिनिक मध्ये “टेस्ट ट्यूब बेबी” आणि “न्यूरोलॉजी” सेंटर सुरू केले आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडेल अशीच सेवा ते देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी डॉ.परुळेकर म्हणाले, या आनंद क्लिनिकच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली नवी सेवा आम्ही सर्वसामान्यांचा विचार करूनच देऊ. तसेच विश्वसनीय सेवा मिळण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक या ठिकाणी कार्यरत असणार आहे. त्यांच्याकडून योग्य तो सल्ला आणि उपचार रुग्णांना मिळणार आहेत. त्यामुळे सावंतवाडीसह जिल्ह्यातील वंध्यत्व असलेल्या स्त्रियां व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नवा आनंद फुलण्यास मदत होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.