वेदमूर्ती हरिश्चंद्र गवस यांना “उत्कृष्ट संस्कृताचार्य गौरव पुरस्कार” प्रदान…  

1
2
Google search engine
Google search engine

दोडामार्ग,ता.०४: संस्कृत भाषेकरिता विविध स्तरावर कार्य करणाऱ्या वेदमूर्ती हरिश्चंद्र गवस यांना “उत्कृष्ट संस्कृताचार्य गौरव पुरस्कार” नुकताच प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्या वतीने आयोजित भव्य जिल्हा मेळाव्यात श्री. गवस यांना हा सन्मान देण्यात आला. दरम्यान श्री. गवस हे संस्कृत कार्यानिमित्त विश्वविद्यालयात कर्तव्यबजावत असल्यामुळे त्यांचा हा बहुमान त्यांचे बंधु सूर्यनारायण गवस यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.

यावेळी आरवली-सोन्सुरे क्षेत्राधिकारी शिवचैतन्य आजोबा महाराज, मा. आमदार रमेश पाटील, आदी उपस्थित होते.

आचार्य हरिश्चन्द्र गवस हे गेली अनेक वर्षे आचार्य इन्स्टिट्यूट् सिंधुदुर्ग संस्थेमार्फत , मांगेली सारख्या अत्यंत ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेले व्यक्तिमत्व असून वेद, संस्कृत आदी शास्त्रांचे ते अभ्यासक आहेत. श्री. गवस शास्त्रांच्या प्रचार व प्रसाराचे कार्य अव्याहतपणे करीत आहेत. संस्कृत भाषेच्या उत्थानार्थ अहोरात्र कार्यरत आहेत. याचा सिंधुदुर्ग वासियांना सार्थ अभिमान आहे. या त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.