कणकवली टेंबवाडी ते एस.एम. हायस्कूलपर्यंतचा रस्ता खुला…

3
2
Google search engine
Google search engine

नागरिकांनी मानले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे आभार…

कणकवली,ता.६: शहरातील टेंबवाडी भागातील शिंदे घर ते एम.एम.हायस्कूल पर्यंतच्या राष्‍ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता खुला झाला आहे. स्थानिक जमीन मालकांशी चर्चा केल्‍यानंतर या रस्त्याला संमती दिली. त्‍यामुळे शहरात आणखी एक नवा रस्ता खुला होणार आहे. गेली ३५ वर्षाहून रेंगाळलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लावल्‍याबद्दल टेंबवाडीतील रहिवाशांनी आज नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचे आभार मानले.

कणकवली शहरातील टेंबवाडी भागात मोठ्या प्रमाणात घरे आहेत. सार्वजनिक संतांचा गणपतीही याच भागात आहे. मात्र शहरातील अन्य मार्गांला जोडणारा रस्ता नसल्‍याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या भागातून नगरपंचायत आराखड्यातील रस्ता रस्ता प्रस्तावित होता. हा रस्ता पूर्ण करण्यासाठी गेली तीन वर्षे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजित मुसळे, माजी नगरसेवक अभय राणे, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत आदींचे प्रयत्‍न सुरू होते. अखेर रस्त्यासाठी जागा देण्याचे स्थानिक जमीन मालकांनी मान्य केले. त्‍यामुळे या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. टेंबवाडीतील हा मार्ग आता थेट राष्‍ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे.

टेंबवाडीतील रस्ता प्रश्‍न मार्गी लावल्‍याबद्दल टेंबवाडीतील रहिवासी सागर राणे, आत्माराम (दादू) राणे, व्‍यंकटेश सावंत, औदुंबर राणे, मुंडले गुरुजी, धनंजय कसवणकर, ओंकार राणे, यश पालव, सुधाकर राणे संदेश आडेकर, संदेश चव्हाण आदींनी आज नगरपंचायतीमध्ये येऊन नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आभार मानले. यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे, माजी नगरसेवक अभय राणे आदी उपस्थित होते.

——————