करूळ-एडगांव सीमेनजीक टायर फुटून मालवाहू ट्रक पलटी…

3
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी पोलिसात माहिती; चालक किरकोळ जखमी, मात्र गाडी व मालाचे मोठे नुकसान…

वैभववाडी ता.२३: अचानक टायर फुटल्याने माल वाहतूक करणारा ट्रक रस्त्यात पलटी होऊन अपघात झाला. ही घटना करूळ-एडगांव सीमेनजीक पहाटे चारच्या सुमारास घडली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र ट्रकचे व आतील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त ट्रक कोल्हापूरहून मालवणकडे चालक दत्तकुमार साबळे घेऊन जात होते. यावेळी एडगांव क्रशर नजीक अचानक टेम्पोचा टायर फुटला. व टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. दरम्यान इतर वाहन चालकांने जखमी साबळे यांना बाहेर काढले. त्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गाडीत असलेल्या मालवण मधील व्यापा-यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.