नोकरीसाठी परदेशात गेलेले केसरीतील पाच युवक दुबईत अडकले…

0
2
Google search engine
Google search engine

 

“टुरिस्ट व्हिसा” देऊन स्थानिकाकडून फसवणूक; सावंतवाडी भाजप आक्रमक,चौकशीची मागणी…

सावंतवाडी,ता.२३: “टूरीस्ट व्हिसा” देवून दुबईत नोकरीला लावतो,असे सांगून केसरी येथील एकाने गावातील पाच युवकांना सुमारे पाच लाखाला गंडा घातला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्याठीकाणी नोकरीला गेलेल्या युवकांची परवड झाली आहे. त्यामुळे त्यांना परत आणण्याबरोबर फसवणूक करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी सावंतवाडी भाजपच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष संजू परब व फसवणूक झालेल्या युवकांच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलिसांकडे केली आहे.
संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा,या मागणीसाठी आज सर्व लोकांनी श्री परब यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरिक्षक कोरे यांची भेट घेतली. यावेळी आपण याबाबत निश्चितच तपास करू,तसेच त्या ठीकाणी अडकलेल्या युवकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करू,असे श्री कोरे यांनी आश्वासन दिले.