महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते…

3
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२९: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ व्या वर्धापन दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ १ मे रोजी सकाळी ८ वाजता येथील पोलीस परेड ग्राऊंडवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, विविध संस्था, माध्यम प्रतिनिधी, शासकीय अधिकारी/ कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच कोविड-19च्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या सर्व सूचनांचे पालन करावे. सामाजिक अंतर याबाबतच्या सर्व नियम पाळणे बंधनकारक राहील.

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सकाळी 8 वाजता असल्यामुळे इतर शासकीय कार्यालये व संस्थांनी आपल्या कार्यालयात ध्वजारोणाचा कार्यक्रम सकाळी 7.15 च्या पूर्वी किंवा सकाळी 9 नंतर करावा ,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.