डंपर चालकावर सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवावी…

2
2
Google search engine
Google search engine

महेंद्र सांगेलकर; अन्यथा आरटीओ अधिकाऱ्यांना सावंतवाडीत फिरू देणार नाही…

सावंतवाडी,ता.०६: कोणा राजकीय नेत्याच्या स्वार्थासाठी आरटीओ अधिकार्‍यांकडून सर्वसामान्य डंपर चालकावर होत असलेली कारवाई चुकीची आहे. हा प्रकार तात्काळ थांबवा, अन्यथा आरटीओ अधिकाऱ्यांना सावंतवाडीत फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिला आहे. याबाबत तात्काळ लक्ष घालून परिवहन अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी परिवहन राज्यमंत्री बंटी पाटील यांच्याकडे आपण डंपर व्यावसायिकांच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.