Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवली, ता.११ : मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे अपघातांची मालिका सुरूच राहिली आहे. येथील अवघड वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा २२ चाकी कंटेनर ( जिजे. १६ एयु ६७५५ ) पलटी झाला आहे. हा अपघात आज सकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास झाला. याअपघातात कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार देविलाल सालवी ( वय ३८ ), गिरीधारी गुजर ( वय ३२ ) रा. बाडपी राजस्थान हे या अपघातात जखमी झाले आहेत.
जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते दोघेही खासगी रुग्णवाहिका करून हैदराबाद ला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.