महेंद्रा अॅकेडमीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; इच्छुकांनी सहभाग घ्या, महेंद्र पेडणेकर…
सावंतवाडी,ता.१२: कोकणातील विद्यार्थ्यांमधून अधिकारी घडविण्यासाठी एकमेव संस्था असलेल्या येथील महेंद्रा अॅकेडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पोलिस उपनिरिक्षक, महिला बालविकास अधिकारी, पोलिस भरतीसाठी तयारी करायची आहे. त्यांनी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संचालक महेंद्रा पेडणेकर यांनी केले आहे.
संस्थेच्या माध्यमातून यापुर्वी अनेक विद्यार्थी घडले असून त्यातील काही विद्यार्थी तलाठी तसेच सैनिक बनले आहेत तर काही विद्यार्थी अंतिम टप्प्यात तयारी करीत आहेत. विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण मिळावे, सेवा मिळाव्यात यासाठी सुसज्ज वाचनालय, निट व स्वच्छ वर्ग, आकर्षक उपयोगी पुस्तके, अनोखी शिकविण्याची पध्दत आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अधिकारी बनायचे स्वप्न असेल त्यांनी तात्काळ संपर्क- 7350219093, 9022686944 या नंबरशी साधावा, असे आवाहन श्री. पेडणेकर यांनी केले आहे.