शासनाने कोकणातील प्रत्येक मंदिरासाठी किमान २५ लाखांचा निधी द्यावा…

545
2
Google search engine
Google search engine

परंपरा जपण्यासाठी सिंधुदुर्गात निकष शिथील करण्याची मागणी…

सावंतवाडी,ता.०१: कोकणातील असलेली सर्व मंदिरे ही त्या काळच्या जनतेने स्वनिधी उभारुन बांधलेली आहेत. त्यामुळे त्या मंदिरांचे पुनर्जीवन करण्यासाठी शासनाकडुन प्रत्येक मंंदिराला किमान २५ लाखांचा निधी मिळावा, अशी मागणी आज येथे झालेल्या देवस्थान उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आली.

दरम्यान कोल्हापूर आणि सांगलीच्या धरतीवर सिंधुदुर्गातील मंदिरात होणारे कार्यक्रम हे वेगळे आहेत. त्यामुळे येथिल परंपरा टिकविण्यासाठी अटी शिथिल करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेगळे निकष लावण्यात यावेत, अशी ही मागणी करण्यात आली. माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत देवस्थान उपसमितीच्या पदाधिकार्‍यांची बैठक आज तेली यांच्या निवासस्थांनी पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने प्रत्येक उपसमिती स्थापन करताना जी गावसभा घ्यावयाची आहे. ती सभा मंदिरातील मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीतच घेण्यात यावी. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या स्थानिक सल्लागार समित्यांची नेमणुक करतानाच्या नियमांमध्ये बदल करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समित्या स्थापन करताना तेथील रूढी, परंपरा, गावऱ्हाटी यांच्या समन्वय साधून समित्या स्थापन कराव्यात यावा हा बदल अपेक्षीत आहे. कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातील मंदिरामध्ये होणारे कार्यक्रम वेगळे असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षभरात सुमारे ३०-३५ कार्यक्रम मानकरी, पुजेकरी यांच्या उपस्थितीत साजरे होतात. ती परंपरा कायम टिकण्यासाठी वरील अटी शिथील करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेगळे नियम अपेक्षित आहेत, असे बैठकीत ठरले.

पोलिस अधिक्षक यांच्या चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र आवश्यक असण्याची अट आहे. ती शिथिल करून पूर्वीप्रमाणे पोलिस पाटीलांच्या दाखल्यावरच काम पूर्ण होईल असे मान्य करावे. कोकणातील सर्व मंदिरे तेथील, जनतेने स्वखर्च निधीतून बांधलेली आहे. हा निधी गावा-गावातून उभा केलेला आहे. त्यासाठी मदत म्हणून शासनाकडून प्रत्येक गावातील मंदिरासाठी किमान २५ लाख रूपये मिळावे. ही अपेक्षा आहे, असे चर्चेतून ठरले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरी पुनाजी राऊळ, एल.एम सावंत, ज्ञानेश्वर परब, अशोक गावडे, शशिकांत गावडे, बाळू सावंत, विलास गवस, गोविंद लिंगवत, नारायण राऊळ, कृष्णा राऊळ, पंढरीनाथ राऊळ, बाळा राऊळ, राजन राऊळ, सुनील परब, वसंत गावडे, आत्माराम परब, महादेव गावडे, चंदन धुरी, पुंडलिक राऊळ, शिवराम राऊळ, लाडजी शंकर राऊळ, भरत गावडे, गणपत राणे, विश्वनाथ राऊळ, बापू राऊळ. या चर्चेला गावतील जाणकार व्यक्ती व मानकरी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.