Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सर्वेश भिसे व्दितीय तर संदीप चव्हाण तृतीय…
सावंतवाडी,ता.२७: येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्राच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापनशास्त्र पदविका अभ्यासक्रमात संतोष श्रीधर टक्के (वैभववाडी) यांनी ७२.७५ टक्के मिळवून प्रथम, सर्वेश हरी भिसे (कणकवली) ६९.७५ टक्के मिळवून द्वितीय तर संदीप प्रकाश चव्हाण (म्हापण) यांनी ६९ टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
यांना केंद्र संयोजक राजेश मोंडकर, संदीप तेंडोलकर, महेंद्र पराडकर, सचिन खुटवळकर, अजय लाड यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, मार्गदर्शक डॉ. जी. ए. बुवा यांनी अभिनंदन केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.