कोरोना रूग्णांचे हाल होण्यास जिल्हा आरोग्य यंत्रणा जबाबदार….

516
2
Google search engine
Google search engine

नारायण राणेंचा आरोप;नातेवाईक आणी सरपंचाच्या तक्रारीची घेतली दखल….

सिंधुदुर्गनगरी ता.०५: जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून आतापर्यंत एकूण १०५ कोरुना बाधित रुग्ण आढळले आहेत,तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अशा परिस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा रुग्णांवर योग्यरीत्या उपचार करत नाही,त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत,असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे.दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला शासनाने वाढीव निधी देणे गरजेचे होते,मात्र हे सरकार जिल्ह्याला दिलेला निधी सुद्धा परत घेत आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.श्री.राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते बोलत होते.

 

श्री.राणे यांनी आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे भेट घेत चर्चा केली.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी आमदार नितेश राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिप अध्यक्षा समिधा नाईक, राजेंद्र म्हापसेकर, सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, प्रमोद जठार, अतुल काळसेकर आदि उपस्थित होते.

यावेळी खास. नारायण राणे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात१०५ रुग्ण सापडले आहेत.यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.सर्व रुग्ण हे मुंबई मधील आहेत.आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करायला कमी पडत आहे. कोरोनावर ज्या प्रमाणे उपचार कारायला हवे तसे उपचार जिल्हा रुग्णालयात केले जात नाहीत.कोरोना बाधित रुग्णांना आवश्यकत्या सुविधा दिल्या जात नाहीत.त्यामुळे त्यांचे हाल होत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करत असल्याचा आरोपही खा. राणे यांनी यावेळी केला.तसेच याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.शासनाने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला आवश्यक ती साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी.यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.