कचऱ्याच्या समस्येसाठी दीपक पाटकर यांचा पुढाकार…

3
2
Google search engine
Google search engine

स्थानिक नागरिकांसह सातेरी बालगोपाळ मंडळाच्या वतीने सत्कार..

मालवण, ता. ०८ : शहरातील देऊळवाडा सातेरी मंदिर येथील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी स्वखर्चाने दोन कचराकुंडी या भागासाठी भेट दिल्या. यावेळी सातेरी मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक बाळू आचरेकर, अरविंद मराळ व आई सातेरी बाळगोपाळ मित्रमंडळाच्या वतीने पाटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक बाळू आचरेकर, अरविंद मराळ, वसंत वीर, शरद यादव, प्रमोद करलकर, अशोक मराळ, जितेंद्र मराळ, संतोष मराळ, प्रमोद मराळ, शिवराम मराळ, उदय वीर, देवेंद्र मराळ, राहुल वीर, सुरज कदम, अक्षय मराळ, ऋषी मराळ, अनिकेत मराळ, अंकुश मराळ, पिंटू घाडी, श्री यादव हे यावेळी उपस्थित होते.