सावंतवाडी तालुक्यात रात्रीपासून मुसळधार…

810
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तळवडे बाजारपेठेत पाणी घुसले; इन्सुलीत जुन्या महामार्गावर पाणी…

सावंतवाडी,ता.१२: तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. तळवडे येथील बाजारपेठ पुन्हा पाण्याखाली गेली आहे. तर जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे महामार्ग बंद झाला आहे. तर माजगाव मध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्यामुळे काही घरात पाणी शिरण्याबरोबर झाडे उन्मळून पडल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबतची माहीती तेथील सामाजिक कार्यकर्ते संजय माजगावकर यांनी दिली. तर तळवडे येथील बाजारपेठेत पाणी भरल्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची माहीती मिळताच माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, सरपंच संदिप आंगचेकर यांनी त्या ठिकाणी जावून पाहणी केली, तर इन्सुली येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे काही तास वाहतूक खोंळबली. मात्र पर्यायी मार्गाचा वापर करीत वाहन चालक मार्गस्थ झाले.

\