ऑलिम्पियाड परीक्षेत सावंतवाडीच्या मिलाग्रीसचे यश…

23
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०८: ऑलिम्पियाड परीक्षेत येथील मिलाग्रीस शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. गणित व विज्ञान या विषयांमध्ये प्रशालेतचे विद्यार्थी कु. आदित्य पारधी (इयत्ता ६ ड) व कु. मानस जानकर (इयत्ता ७ ड) यांनी कांस्य पदक व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.