फायनान्स कंपनीच्या नावावर तुळस येथील युवकाची लाखाची फसवणूक…

21
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२३: तुळस येथील युवकाची फायनान्स कंपनीचे नाव सांगून तब्बल १ लाख ८ हजाराची  ऑनलाईन फसवूणक करण्यात आली आहे. संदिप पेडणेकर असे त्याचे नाव आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार राहूल नामक व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती वेंगुर्ले पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळस-फातरवाडी येथील संदिप पेडणेकर यांची ७ ते २२ ऑगस्ट या कालावधीत राहुल नामक बोलणाऱ्या इसमाने तो मेन्स सर्व्हसेस फायनान्स मधून बोलत असल्याचे सांगून आपणांस मेन्स सर्व्हिसेस फायनान्सकडून लोन मिळणार, असे खोटे सांगून आपल्याकडून ऑनलाईन १,०८,९१५ एवढी रक्कम पे च्या फोनवर ट्रान्सफर करून घेतली. मात्र लोन न दिल्याने आपली फसवणूक झाली आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यामध्ये संदिप पेडणेकर यांनी तक्रार दाखल दिली असून राहुल नामक व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.