कुडाळातील गणेश सजावट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद…

12
2
Google search engine
Google search engine

२४ स्पर्धकांचा सहभाग; उद्या पासून होणार परिक्षणाला सुरूवात…

कुडाळ,ता.२०: येथील नगरपंचायतीच्या वतीने शहर मर्यादित पर्यावरण पूरक गणेश आरास सजावट स्पर्धेमध्ये २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला असून उद्या पासून या स्पर्धेचे परीक्षण सुरू होणार असल्याचे नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने पर्यावरण पूरक गणेश आरास सजावट स्पर्धा १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी समिती गठीत करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण २४ स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे.

या स्पर्धेतील ज्यांचे गणपती पाच दिवस आहेत अशा स्पर्धकांच्या घरी स्पर्धा परीक्षणासाठी परीक्षक हे उद्या दुपारी ३ ते ५ या वेळेत परीक्षणासाठी येणार आहेत. व ज्यांचे गणपती अकरा दिवस आहेत अशा स्पर्धकांना परीक्षणाची वेळ व दिनांक कळविण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकार म्हटले असून या स्पर्धेमध्ये सदानंद रमाकांत कांदे (नाबरवाडी), गुरुनाथ काशिराम गडकर (लक्ष्मीवाडी), ओंकार विठ्ठल मडवळ (लक्ष्मीवाडी), आदित्य सत्यनारायण आळवे (लक्ष्मीवाडी), तुषार विनायक आजगांवकर (लक्ष्मीवाडी), विघ्नेश दिपक पाटील (लक्ष्मीवाडी), विलास नारायण उमळकर (लक्ष्मीवाडी), कुणाल किशोर काळप (लक्ष्मीवाडी), मनोहर लक्ष्मण काळप (लक्ष्मीवाडी), साहिल सच्चिदानंद राऊळ (भैरववाडी), प्रतिक गंगाराम राऊळ (कुडाळेश्वरवाडी), वसंत विनायक राऊळ (कुडाळेश्वरवाडी), अरविंद शंकर मेस्त्री (भैरववाडी), दिनेश रमेश मेस्त्री (भैरववाडी), गौरव नंदकुमार किनळेकर (पानबाजार), विघ्नेश उमेश दाभोलकर (एमआयडीसी), शैलजा प्रकाश कांबळी (लक्ष्मीवाडी), शार्दुल सत्यवान राऊळ (कुडाळेश्वरवाडी), केतन मालजी पवार (कुडाळेश्वरवाडी), मिलिंद गोविंद परब (सांगिर्डेवाडी), साई दिलीप तळवणेकर (श्रीरामवाडी), रामा मारुती गवळी (केळबाईवाडी), प्रथमेश राऊळ (पाचेकरवाडी), राहुल शंकर पाटणकर (लक्ष्मीवाडी) हे स्पर्धक सहभागी झाले आहेत.