पोस्टर मेकिंगमध्ये पार्थ मेस्त्री तर वक्तृत्व मध्ये सर्वेश मसुरकर प्रथम…

125
2
Google search engine
Google search engine

मालवण,ता.२४: जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पोस्टर मेकिंग स्पर्धेत भंडारी हायस्कूलच्या पार्थ साईनाथ मेस्त्री तर वक्तृत्व स्पर्धेत वराड हायस्कूलच्या सर्वेश राकेश मसुरकर याने प्रथम क्रमांक पटकावला.

या दोन्ही स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोस्टर मेकिंग- द्वितीय- मयुरेश दिलीप वांगणकर (भंडारी हायस्कूल), तृतीय -जानवी प्रमोद चव्हाण (भंडारी हायस्कूल), उत्तेजनार्थ सोहन दिगंबर मेस्त्री (सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल पोईप विरण), कौस्तुभ राजन गावडे (भंडारी हायस्कूल), तनुश्री भरत काळसेकर (टोपीवाला हायस्कूल)

वक्तृत्व स्पर्धा- द्वितीय- दीक्षा प्रभाकर वराडकर (वराड हायस्कूल, वराड), तृतीय – सुधीर संदीप आरस (टोपीवाला हायस्कूल)

विजेत्या स्पर्धकांना आज मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, डॉ. राहुल पंतवालावलकर, डॉ. अनुप पळसंबकर, भानुदास कुबल, पत्रकार अमित खोत आदी उपस्थित होते.