सावंतवाडीत उद्या पासून “महासंस्कृती” महोत्सवाची धूम…

347
2
Google search engine
Google search engine

किशोर तावडे; पाच दिवस सांस्कृतीक कार्यक्रमांसह खाद्य संस्कृतीची मेजवानी…

सावंतवाडी,ता.०५: शासनाच्या माध्यमातून सावंतवाडी जिमखाना येथे “महासंस्कृती” महोत्सव रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध खाद्य संस्कृतीच्या मेजवानी सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची मजा जिल्हा वासीयांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज येथे केले.

उद्या पासून होणार्‍या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर श्री. तावडे यांनी येथिल महोत्सवाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी संपुर्ण परिसराची व तयारीची पाहणी केली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील, पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. तावडे म्हणाले की, या ठिकाणी उद्या पासून पाच दिवस होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती वृध्दिंगत व्हावी हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्राची लोकधारा, ७ फेब्रुवारीला जल्लोष सिंधुदूर्ग, ८ तारखेला महानाट्य शिवबा, ९ ला मराठी बाणा आणि १० तारखेला गायक अवधुत गुप्ते यांचा संगीत रजनी हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी जास्तीतजास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी श्री. तावडे यांनी केले.