दारू वाहतूक प्रकरणी कुडाळात दोघांवर कारवाई…

369
2
Google search engine
Google search engine

२५ लाखाचा मुद्देमाल जप्त; एक संशयित फरार, दुसरा ताब्यात…

कुडाळ,ता.१४: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १० लाखाच्या दारूसह १५ लाखाची गाडी असा एकूण २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वेश भास्कर केरकर ( वय २७ रा. सातार्डा ता. सावंतवाडी ) व गौरव गिरीधर केरवडेकर ( वय ३४ रा. केरवडे, ता. कुडाळ ) अशी दोघांची नावे आहेत.

त्यातील केरवडेकर हा घटनास्थळावरून फरार झाला आहे, ही कारवाई आज पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे यांनी त्या दोघांच्या विरोधात तक्रार दिली आहे, त्यानुसार त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरकर याला अटक करण्यात आली असून केरवडेकर याचा शोध घेण्याचे काम कुडाळ पोलीस करत आहेत.