सावंतवाडीतील एसटी कर्मचाऱ्यांचा भाजप कामगार सेनेत प्रवेश…

266
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२९: येथील एसटी डेपोत कार्यरत असलेल्या ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आज भाजप कामगार सेनेत प्रवेश केला. भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला.
यावेळी भगवान वरक, अरुण सरदेसाई, व्ही.एम परब, संदीप गवस, धोंडीबा दळवी, आनंद लांबर, कृष्णा सावंत, गुंडू सावंत, संजय सासोलकर, आर.पी नाईक, जे.के. मांजरेकर, सचिन साळगावकर, प्रशांत मयेकर, पी.पी मेस्त्री, एस.एस गवस, आर.एस गावकर, एम.बी शिंदे आदींनी प्रवेश केला.
यावेळी भाजप प्रणीत सेवा शक्ती संघर्ष जनसंघ, कामगारसेना जिल्हाध्यक्ष अशोक राणे, तालुकाध्यक्ष अजय गोंदावळे, कामगार मोर्चा शहराध्यक्ष विनोद सावंत, दोडामार्गचे नगरसेवक राजेश प्रसादी, राम वाडकर, केतन आजगावकर, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते.