रेडीतील “त्या” संशयास्पद जहाजाचा संपर्क जिल्ह्याशी नको…

2

जयेंद्र परुळेकर; तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करा,थातूर-मातूर नको…!

 

सावंतवाडी ता.०८:”कोरोना” व्हायरसचे जगावर संकट असताना रेडीत असलेल्या जहाजावर असलेल्या कर्मचाऱ्यांबाबत संशय आहे.त्यामुळे जोपर्यंत सक्षम व तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून “त्या” कर्मचाऱ्यांची तपासणी होत नाही,तोपर्यंत “त्या”जहाजाचा संपर्क रेडी येथील ग्रामस्थांसह जिल्हयाशी होणार नाही,याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी,अशी मागणी आपण पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहे,असे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.दरम्यान काल याठिकाणी असलेल्या जहाजावर कर्मचाऱ्यांची तपासणी खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून झाली असली तरी ती अंतिम नाही.त्यामुळे कोणाच्या तरी फायद्यासाठी थातूरमातूर उत्तरे देऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याशी खेळू नये,असेही यावेळी श्री.परुळेकर म्हणाले.
श्री.परुळेकर यांनी रेडी आलेल्या जहाजाच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी पत्रकार परिषदेत घेतली.ते म्हणाले चीन देशात हाहाकार उडवणाऱ्या व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर रेडीच्या समुद्रात असलेल्या माल वाहतूक करणाऱ्या जहाजावर चीनमधील कर्मचारी असल्याचे वृत्त आहे.दुसरीकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाने त्यातील कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत योग्य ती माहिती दिली नाही.सर्व खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेऊन थातूरमातूर तपासणी केली गेली आहे.या प्रकारच्या विरोधात श्री.कोळेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्यांची तपासणी पुणे येथील एन.आय.व्ही या संस्थेमार्फत करण्यात यावी आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात यावा तसेच केवळ कोणाच्यातरी फायद्यासाठी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना फक्त मास्क देऊन त्या ठिकाणी पाठवणे चुकीचे आहे.जगावर संकट असताना अमेरिकेसारख्या देशाने आपल्या देशात चिनी नागरिकांना बंदी केली आहेमात्र भारतात आणि पर्यायाने सिंधुदुर्गातील प्रशासन गुपचूप आहे.ही चिंतेची बाब आहे,असेही श्री.परुळेकर म्हणाले.

244

4