पराभवाचे शल्य, देवेंद्र फडणवीस राजीनामाच्या तयारीत…

444
2
Google search engine
Google search engine

पुढचा वेळ पक्षासाठी; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करणार…

मुंबई,ता.०५: लोकसभेत राज्यात मिळालेले अपयश जिव्हारी लागणारे आहे. त्यामुळे सरकारमधून मला मोकळं करावं, अशी मी वरिष्ठांना विनंती करणार आहे. या पुढचा वेळ पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी देणार आहे. पूर्ण वेळ संघटनेसाठी काम करणार आहे, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे मांडली. आपण प्रामाणिकपणे काम केलं होतं. परंतु संविधान बदलण्यात येणार आहे, असे चुकीचा प्रचार विरोधकांकडून करण्यात आल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे ही जबाबदारी मी स्वीकारतो आहे, असे त्यांनी सांगितले. आज श्री. फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.