हळवल शिवराई मंदिराकडे जाणाऱ्या कॉजवेचे काम ग्रामस्थांनी रोखले…

73
2
Google search engine
Google search engine

सुरू असलेले काम देखील निकृष्ठ असल्याचा आरोप…

कणकवली,ता.१२: तालुक्यातील हळवल गावातील शिवराई मंदिराकडे जाणाऱ्या कॉजवेचे काम येथील ग्रामस्थांनी रोखले आहे. सध्या हळवल शिवराई मंदिराजवळ जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या कॉजवेचे काम सुरु आहे. मात्र सदर काम नित्कृष्ट दर्जाचे आल्याचा आरोप करून हळवल येथील ग्रामस्थानी काम बंद पाडले.

जिल्हापरिषदच्या जिल्हा वार्षिक निधीतून तब्बल ४३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कॉजवेच्या कामाची ऑर्डर आचार संहितेपूर्वी काढण्यात आली होती. मात्र सदर ठेकेदाराने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थांचा येण्या – जाण्याचा मार्ग बंद झाला. तात्पुरता पर्यायी रस्ता काढून ग्रामस्थांचा मार्ग खुला करण्यात आला होता. परंतु मागील दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे पर्यायी मार्गांवर पाणी साचून चिखल झाला. येण्याजाण्याचा मार्ग व्यवस्थित नसल्याने येथून चालणे देखील मुश्किलीचे झाले आहे. तसेच सदर कॉजवेचे काम देखील चुकीच्या पद्धतीने व निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आणि येथील काम बंद पाडले.

यावेळी हळवल येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राणे, हळवल ग्रामपंचायत सदस्य अनंत राणे, रोहित राणे, प्रथमेश राणे, अतुल राणे, सौरभ सावंत, शंतनू राणे, विनय सावंत, सिद्धी राणे, विकास गुरव, विजय चव्हाण, नंदकुमार फणसळकर, प्रसाद पंडित, प्रशांत दळवी, दुर्गप्रसाद काजरेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.