जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धेत तेंडोलीचा भाविक मेस्त्री प्रथम…

182
2
Google search engine
Google search engine

तुळस येथील मंदार नाईक द्वितीय, इन्सुली येथील चिन्मयी मेस्त्री तृतीय…

सावंतवाडी,ता.२४: राधारंग फाऊंडेशन, सिंधुदुर्ग व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत तेंडोली येथील भाविक मेस्त्री याने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर तुळस येथील मंदार नाईक याने द्वितीय, सावंतवाडी येथील चिन्मयी मेस्त्री हिने तृतीय व अलिषा मेस्त्री, आर्या आजगावकर यांनी उत्तेजनार्थ येण्याचा मान मिळवला आहे.

प्रभाकर वेलिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेस स्पर्धकांचा व सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध गायक स्वप्निल गोरे यांनी केले. स्पर्धेस संगीत साथ निरज मिलिंद भोसले (तबला), मंगेश रामचंद्र मेस्त्री (ऑर्गन), पुरुषोत्तम (समर्थ) सीताराम केळुसकर (हार्मोनियम) व भास्कर मेस्त्री यांनी मंजिरी साथ केली तर संपुर्ण स्पर्धेचे निवेदन नितीन धामापूरकर व सिद्धी परब यांनी केले, व ध्वनि व्यवस्था हेमंत मेस्त्री यांनी सांभाळली.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अर्चना घारे-परब यांची विशेष उपस्थिती लाभली, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ निवेदक संजय कात्रे व राधारंग फाउंडेशन चे अध्यक्ष हेमंत खानोलकर, उपाध्यक्ष ॲड. पी. डी. देसाई, सचिव पूर्वा नाईक, सचिन सामंत, अमेय देसाई, अरुणा सामंत, गुरुनाथ नार्वेकर, प्रथमेश नाईक तसेच सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष निलेश मेस्त्री, सचिव वैभव केंकरे, किशोर सावंत, सोमा सावंत, आदी पदाधिकारी व विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीचे नंदू शिरोडकर उपस्थित होते. त्याच बरोबर जिल्ह्यातील नामवंत पखवाज वादक आनंद मोरये, सुप्रसिध्द भजनी बुवा कृष्णा राऊळ, गजानन मेस्त्री, मालवणी कवी दादा मडकईकर आदी मान्यवरांनी स्पर्धेतील मुलांना प्रोत्साहन देत उपस्थीती दर्शवली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मधुरा खानोलकर, गोविंद मळगावकर, निरज भोसले, मंगेश मेस्त्री, समर्थ केळुसकर, मनिष पवार, केतकी सावंत, सर्वेश राऊळ, सहील चोचे, अक्षय रमाणे यांनी मेहनत घेतली.