नुकसानीची पाहणी करण्यासाठी आशिष शेलार उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

75
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.०१:

जिल्ह्यात क्यार वादामुळे तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिक्षण मंत्री आशिष शेलार उद्या जिल्हा दौ-यावर येणार आहेत.यावेळी ते ग्रामीण भागात फिरून,स्वतः शेतावर जाऊन पाहणी करणार आहेत.याबाबतची माहिती बांद्याचे माजी सरपंच मंदार कल्याणकर व पंचायत समिती सदस्य शितल राऊळ यांनी दिली.
श्री.शेलार हे २ व ३ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात येत आहेत.क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.कोकणातील बहुतांशी भाजपच्या लोकप्रतिनिधीनी या नुकसानी बाबत शासनाने दखल घ्यावी,अशी मागणी केली होती.खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन भाजपाने नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी केली होती.स्थानिक आमदार नितेश राणे यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.याला यश येऊन शासनाचे प्रतिनिधी म्हणून शेलार हे नुकसान भरपाईच्या पाहण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत.यामध्ये बंदर व मच्छीमारांना मच्छीमारांचे झालेले नुकसान याची पाहणी करणे भातशेती नुकसान पाहणी करणे फळबागांचे नुकसान पाहणी करणे व सर्व संबंधित अधिकार्‍यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणे असे दौऱ्याचे स्वरूप आहे आशिष शेलार यांच्या दौऱ्यामुळे नुकसान भरपाई पंचनामे व अहवाल याला योग्य दिशा मिळेल असा असा आशावाद शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे