कणकवलीचा सुरज राणे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत प्रथम…

180
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले.ता,१७: 
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस च्यावतीने ‘भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तिरेखा’ या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत कणकवलीच्या सुरज अविनाश राणे याने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत जिल्ह्यातून १८ स्पर्धकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने वेताळ मंदिर तुळस येथे आयोजित सदर जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे उदघाटन जि. प. सिंधुदुर्ग चे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदयोगपती दादासाहेब परुळकर, वेंगुर्ला पं. स. सभापती अनुश्री कांबळी, संरपंच शंकर घारे, उपसरपंच जयवंत तुळसकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर, उपाध्यक्ष विवेक तिरोडकर, नाना राऊळ, निवृत्त शिक्षक दाजी परुळकर, महेश राऊळ, सद्गुरू सावंत, महेश राऊळ, केशव सावंत, सदाशिव सावंत, किरण राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तिरेखा विषयावर सुरज राणे यांनी काढलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर या अतिशय सुरेख रंगोळीस प्रथम क्रमांक मिळवत लक्षवेधी ठरली. तर भारतरत्न सचिन तेंडूलकर यांची व्यक्तिरेखा साकारत केदार सखाराम टेमकर (सरंबळ- कुडाळ) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर भारतरत्न झाकीर हुसेन यांच्या व्यक्तिरेखेला विजय तुकाराम मेस्त्री (पिंगुळी कुडाळ) यांना तृतीय क्रमांक मिळवला. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक शंकर राणे यांनी केलं.