टाटा सुमोमधून गोवा बनावटीची दारु जप्त…

211
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल…

वैभववाडी,ता.११: टाटा सुमोमधून गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या दोघांवर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. १ लाख ८३ हजार चाळीस रुपयांची दारु व १ लाख ५५ हजार रुपये किमतीची टाटा सुमो असा एकूण ३ लाख ३८ हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल वैभववाडी पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे ४.२५ वाजण्याच्या सुमारास एडगाव तिठ्यावर करण्यात आली. संशयित आरोपींना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून सांगलीला गोवा बनावटीची दारु घेऊन जाणारी टाटा सुमो गाडी नं- एमएच १४- ५५७१ एडगाव तिठ्यावर आली असता, मंगळवारी पहाटे शहरात गस्तीला असणाऱ्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी टाटा सुमोची तपासणी केली असता, २६ बॉक्स दारुचे आढळून आले.
पोलिसांनी दारुसह टाटा सुमो वैभववाडी पोलिस स्थानकात आणून संशयित आरोपी जितेंद्र अशोक मोहिते रा. इस्लामपूर, रोहीत राजेंद्र कांबळे रा. पलूस, सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. मंगळवारी संशयित आरोपींना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर असणारे पोलिस कॉन्स्टेबल प्रसाद पाटील, पोलिस हवालदार अशोक सावंत यांनी केली. अधिक तपास पोलिस नाईक मारुती साखरे करीत आहेत.