बांदा-डिंगणे मार्गावर छुप्या पद्धतीने होणारी दारू वाहतूक रोखली…

190
2
Google search engine
Google search engine

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई; ३ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त…

बांदा ता.०५: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असूनही गोव्याहून जिल्ह्यात बेकायदा दारू वाहतूक सुरूच आहे. सिंधुदुर्ग-गोवा सीमा सील असतानाही छुप्या पद्धतीने दारू वाहतूक सुरू असल्याचे सिद्ध होत आहे.आज सकाळी बांदा-डिंगणे मार्गावर सटमटवाडी येथे अल्टो मोटारीतून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. या कारवाईत ७५ हजार ६०० रुपये किमतीची दारु जप्त केली.तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली ३ लाख रुपयांची अल्टो मोटार (एमएच ०७ एजी ३५३२) ताब्यात घेण्यात आली.बेकायदा दारु वाहतुक केल्याप्रकरणी दिनेश रामचंद्र मयेकर (वय ५१, रा. पिंगुळी-कुडाळ) याच्यावर कारवाई करण्यात आली. याबाबतची फिर्याद एलसीबीचे कर्मचारी जयेश वासुदेव सरमळकर यांनी बांदा पोलीसांत दिली आहे. ही कारवाई आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बॉर्डर सील असताना व सर्वत्र पोलीस बंदोबस्त असतानाही होणार्‍या बेकायदा धाडसी दारू वाहतुकी बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.