वेंगुर्ले शहर कंटेनमेंट झोन….

2161
2
Google search engine
Google search engine

वेगुर्ला मुख्याधिका-यांची माहीती; शहरातील सर्व दुकाने व मार्केट बंद…

वेंगुर्ले ता.०५: तालुक्यातील वायंगणी येथील व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने व वेंगुर्ला शहर कंटेन्मेंट झोन मध्ये येत असल्याने केंद्र शासनाच्या सूचनांनुसार उद्या बुधवार पासून वेंगुर्ला शहरातील सर्व दुकाने आणि मार्केट बंद करण्यात आलेली आहेत. बंदीचे पालन न केल्यास कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी केले आहे.
तालुक्यातील वायंगणी, दाभोली, खानोली, केळूस ग्रामपंचायत क्षेत्र आणि वेंगुर्ला शहर हे कंटेन्मेंट झोन मध्ये येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्व दुकाने, बाजार व लोकांच्या रहदारीवर पूर्ण निर्बंध घालण्यात आलेले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत मेडिकल, रेशन दुकान ते भाजी विक्री पर्यंत चे सर्व व्यवहार बंद राहतील.
दरम्यान वेतोरे, म्हापण, मेढा, पालकरवाडी, मठ, अडेली, वझराट, होडावडा, तुळस ,पाल, मातोंड, असोली, उभादांडा, मोचेमाड, परबवाडा, अनसुर हे ग्रामपंचायत क्षेत्र बफर झोन मध्ये येत असल्याने या ग्रामीण भागात केवळ जीवनावश्यक वस्तू व मेडिकल सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तरी सर्व नागरिकांना प्रशासनामार्फत घरातून बाहेर न पडण्याची विनंती करण्यात येत आहे, असे श्री साबळे यांनी सांगितले.