राजन साळवी आपला वाढदिवस साधेपणाने करणार साजरा….

69
2
Google search engine
Google search engine

राजापूर,ता.०५: राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी ९ जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले आहे. कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावात कोविड योद्धे म्हणून काम करण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.
९ जुलै रोजी डॉ. साळवी यांचा वाढदिवस आहे. त्यांनी सांगितले की, माझा वाढदिवस माझे सर्व शिवसैनिक, हितचिंतक आणि माझ्यावर प्रेम करणारे शेकडो नव्हे जर हजारो मित्र, माझे मतदार बंधू भगिनी माझा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात, आणि मला शुभेच्छा देऊन माझ्याप्रति आपले प्रेम व्यक्त करतात. मलाही त्यांच्या शुभेच्छा आशीर्वादाने नवी ऊर्जा आणि उमेद मिळते. पण यावेळी जल्लोष आणि आनंद व्यक्त करण्यासारखी परिस्थिती नाही.
कोरोना महामारीचे मोठे संकट घोंगावत आहे. दिवसेंदिवस हा धोका वाढत आहे. सर्व मानवजातीवर भीतीची छाया पसरली आहे. आणि प्रत्येकजण अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे मला योग्य वाटत नाही. आणि ते आपल्या संस्कृतीत देखील बसत नाही. आपल्याला देखील याची जाणीव आहेच. त्यामुळे माझी हात जोडून सर्वना विनंती आहे, की यावेळचा माझा वाढदिवस साजरा न करता, शुभेच्छा तसेच अन्य कोणताही कार्यक्रम न करता श्यक्य असेल त्यांनी मास्क वाटप, सॅनिटाइझर वाटप, गोरगरीबांना धान्य वाटप असे उपक्रम राबवून आपण कोविड योद्धे म्हणून काम करूया. त्याच माझ्यासाठी तुमच्या शुभेच्छा असतील. कोरोनाचे संकट नष्ट झाल्यानंतर निश्चितच आपण एक आनंदोत्सव साजरा करू. असे आवाहन त्यांनी केले आहे.