वैभववाडी तहसिल कार्यालयात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला…

767
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी/पंकज मोरे,ता.२४: देशभरासह जगभरात कोरोनाचे ढग दिवसेंदिवस गडद होत चालले आहेत. वैभववाडी तहसील कार्यालयातील एका महिला अधिकारी यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून तहसील कार्यालय सँनीटायझर करण्यासाठी बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ऐन गणेश चतुर्थी सणात तालुक्यातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी पॉझिटिव्ह आढळल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची डोकेदुखी अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर संपर्कातील सहा कर्मचाऱ्यांचे स्वँब घेण्यात येणार आहेत. त्या सहाही जणांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना सांगुळवाडी येथे क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. उमेश पाटील यांनी दिली आहे.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या कोरोना नियोजन बैठकीत दुसऱ्या तालुक्यातून व परजिल्ह्यातून वैभववाडीत ये-जा करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयातच राहावे. अशी सूचना भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी मांडली होती. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे बोलले जात आहे.