आंबोली-कबुलायतदार गावकर प्रश्नी रामचंद्र गावडेंनी आपली “डबल ढोलकी” बंद करावी..

230
2
Google search engine
Google search engine

 

शशिकांत गावडेंची प्रतिटिका; कालच्या दौर्‍यात सेनेचा मास्क लावून केसकरांची भलावण कोणी केली…?

आंबोली

महसुल राज्यमंत्र्यांच्या कालच्या दौर्‍यात तोंडाला शिवसेनेचा मास्क लावून दिपक केसरकर यांना “भाई तुम्हीच हा प्रश्न सोडवू शकता”,असे सांगणार्‍या भाजपाच्या रामचंद्र गावडे यांनी डबल ढोलकी वाजवून पोपटपंची करू नये,ते रेकॉडींग आमच्याकडे आहे.असा पलटवार शिवसेने विभागीय अध्यक्ष शशिकांत गावडे यांनी केला आहे.दरम्यान लोकसभेत बहीष्कार हा भाजपाचाच विषय होता.त्यामुळे विनायक राऊत यांना मतदान होवू नये,म्हणून हेच आग्रही होत.यामागचा नेमका हेतू काय होता, हे आम्हाला माहीती आहे.असेही श्री.गावडे यांनी सांगितले.
भाजपाचे रामचंद्र गावडे व प्रकाश गावडे यांनी टिका केल्यानंतर पुन्हा शशिकांत गावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून प्रत्यूत्तर दिले आहे.कालच्या दौर्‍यात भाजपाचे रामचद्र गावडे हे तोंडाला मास्क लावून होते.आणि दिपक केसरकर यांची पाठराखण करीत तुम्हीच हा प्रश्न सोडवला आणि तो तडीस तुम्हीच लावू शकता,असे सांगत होते.याचे पुरावे आपल्याकडे आहेत,असे श्री.गावडे म्हणाले.