कलंबिस्त-धामणमळा पुलाची श्रमदानातून स्थानिकांनीच केली दुरुस्ती…

60
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२५: कलंबिस्त-धामणमळा येथील तेरेखोल नदी पात्रावरील अतिवृष्टीमुळे तुटलेल्या पुलाची आज तेथील स्थानिक युवकांनीच पुढाकार घेत दुरुस्ती केली.शासकीय मदतीची कोणतीही वाट न बघता श्रमदानातून संबंधित पुलावर लोखंडी पोल व पत्रा टाकून
तात्पुरती ये-जा करण्यासाठी ते खुले करण्यात आले आहे.दरम्यान या
पुलाची बांधकामचे अभियंता अनिल आवटी व श्री.परांजपे यांनी पहाणी केली.यावेळी लवकरात लवकर संबंधित पुलाचे पक्के काम केले जाईल,असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी प्रल्हाद तावडे,कमलाकर सावंत, दीपक सावंत, शैलेश सावंत, सिद्धू सावंत, सिद्धेश सावंत, नितेश सावंत, शेखर मेस्त्री, राजेश सावंत, आलेक्स रोड्रिक्स, जीवन सावंत, सुशांत पवार, सुशांत सावंत, स्वप्नील सावंत, उल्हास सावंत, शामू राऊळ, नादकिशोर राऊळ, मयूर वारंग, आनंद बिडये, अनिल सावंत, विलास तावडे,पांडुरंग राऊळ,रमेश सावंत आदी ग्रामस्थ या मोहिमेत सहभागी झाले होते.
गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे याठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली होती.दरम्यान या पुरात संबंधित पूल मोडकळीस आले होते.त्यामुळे गावापासून ४ कुटुंबाचा संपर्क तुटला होता.याच पार्श्वभूमीवर येथील युवकांनी पुढाकार घेत या पुलाची दुरुस्ती केली.व तात्पुरती ये-जा करण्यासाठी हा पूल खुला करण्यात आला आहे.