शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव…

235
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.१६: स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव (७५ वर्षे ) वर्षानिमित्त १५ ऑगस्टला ग्रामपंचायत शिरोडा येथे इयत्ता १० वी १२ वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या तसेच व्यवसाय अभ्यासक्रम व इतर क्षेत्रात नावीन्यपूर्ण विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव ग्रामपंचायत तर्फे करण्यात आला.
कोरोना महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत सर्व संकटांवर मात करत या विद्यार्थ्यानी सुयश मिळविले अशा विद्यार्थ्याचा पुढील शैक्षणिक वाटचालीस आत्मविश्वास वाढावा यासाठी कौतुकाची थाप म्हणून सत्कार करून विदयार्थ्याना ग्रामपंचायत च्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी शिरोडा गावचे तलाठी सन्मा. श्री फिरोज खान यांनी गावासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा ही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आरोग्य शिक्षण सभापती व विद्यमान जि.प. सदस्य श्री प्रितेश राऊळ उपस्थित होते. विशेष प्राविण्य मिळविलेल्या सर्व विदयार्थ्यांना उपस्थित प्रमुख मान्यवर तसेच सरपंच श्री मनोज उगवेकर, उपसरपंच श्री राहुल गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री दिलीप गावडे , रवी पेडणेकर, कौशिक परब , मयुरी राऊळ , समृद्धी धानजी, प्राची नाईक तसेच अधिकारी यांचे हस्ते शैक्षणिक भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रितेश राऊळ, विशेष सत्कार मूर्ती फिरोज खान व सरपंच श्री मनोज उगवेकर यांनी आपल्या मनोगता द्वारे उपस्थित विद्यार्थ्याना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. तसेच गुणवंत विदयार्थी व त्यांच्या पालकांनी मिळालेल्या यशाबद्दल मनोगत व्यक्त केले. या यशस्वी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी श्री सुनिल चव्हाण यांनी केले.