सावंतवाडी शहरात कोरोनाचा आकडा घटला, ७ दिवसात शून्य रुग्ण…

1
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डॉ.उमेश मसुरकर; सद्यस्थितीत शहरात ४ सक्रिय रुग्ण…

सावंतवाडी ता.२२: शहरात कोरोनाचा कहर आता बर्‍यापैकी नियंत्रणात आला आहे. गेल्या सात दिवसात याठिकाणी एकही रुग्ण आढळून आला नाही. तर सद्यस्थितीत शहरात फक्त ४ रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.उमेश मसुरकर यांनी दिली. दरम्यान नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच ही संख्या आटोक्यात येत आहे, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर तालुक्यात सुद्धा आज कोरोना रुग्णांचा आकडा शून्य इतकाच राहिला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

\