शिवसेनेच्या संतोष परबांवर हल्ला करणारे चौघे संशयित कारसह ताब्यात…

4
2
Google search engine
Google search engine

फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांची कारवाई; हल्ल्याची कबुली, मात्र कारण गुलदस्त्यात…

कणकवली,ता.१९: जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर हल्ला करणाऱ्या चौघा संशयितांना पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले आहे. मात्र हा हल्ला नेमका कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काल (ता.१८) फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी संतोष परब वर हल्ल्यात वापरलेली इनोव्हा कार क्र. MH 14 – BX – 8326 ही कार ताब्यात घेतली. तसेच आतील चारही संशयितांना ताब्यात घेऊन ओरोस पोलीस स्टेशनला नेण्यात आले. स्वतः एसपी राजेंद्र दाभाडे, ऍडिशनल एसपी नितीन बगाटे यांनी चारही आरोपींची बंद दरवाज्याआड कसून चौकशी केल्याचे समजते.मात्र चौकशीचा तपशील समजू शकलेला नाही. परब वरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी जखमी परब विचारपूस करत खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनीही जखमी परब ची विचारपूस केल्याचे सांगितल्याने या हल्ल्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सांगितले होते. त्यातच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. तर आमदार नितेश राणे यांनी राजकीय गुगली टाकत परब वरील हल्ला हा पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचे सांगत ट्विस्ट निर्माण केला होता. जिल्ह्यात सुरू असलेल्या ४ नगरपंचायत निवडणूका आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब वरील हल्ल्यांर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान चारही आरोपींना आज रिमांडसाठी न्यायालयात हजर करणार असल्याचे समजते.