सबनीसवाड्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर रेलिंग बसविण्याच्या कामाचा आज शुभारंभ…

9
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता.०८: शहरातील चिटणीस नाका येथून सबनीस वाड्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर रेलिंग बसविण्याच्या कामाचा शुभारंभ आज स्थानिक ज्येष्ठ नागरिक वासंती पुरोहित यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून हे काम मंजूर झाले आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, युवा सेनेचे विशाल सावंत, दत्‍ताराम सावंत, सुनील सावंत, पत्रकार शिवप्रसाद देसाई, विश्वास घाग, बंड्या नेरूरकर, रेश्‍मा मालवणकर, मधुकर धोंड, प्रसाद सोईल, शाबिना डान्टस
आदी नागरिक उपस्थित होते.